‘या’ तारखांना होणार सीबीएसई बोर्डाच्या १० वी, १२ वीच्या परीक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाने दहावी, बारावीच्या प्रलंबित परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जारी केले आहे. २९ प्रमुख विषयांच्या परीक्षा होणार आहेत. या परीक्षा १ ते १५ जुलै २०२० दरम्यान होणार आहेत. कोणता पेपर कधी, कोणत्या सत्रात याविषयीची सविस्तर माहिती बोर्डाने दिली आहे.

याचसोबत कोणत्या परीक्षा पूर्ण देशभर होणार आहेत आणि कोणत्या केवळ ईशान्य दिल्लीत होणार आहेत, ते या वेळापत्रकात सविस्तरपणे नमूद करण्यात आले आहे. सर्व परीक्षा सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत होणार आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनीही हे टाइमटेबल ट्विट केले आहे.

विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका १५ मिनिटे आधी वाचायला मिळणार आहे. १०.१५ वाजता त्यांना प्रश्नपत्रिका दिली जाईल आणि १०.३० वाजता पेपर सुरू होईल. या व्यतिरिक्त कोरोनाच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाने खबदारी म्हणून विद्यार्थ्यांसाठी काही विशेष सूचना जारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर येताना नाक, तोंड झाकणे बंधनकारक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम काटेकोररित्या पाळणे अत्यावश्यक आहे, असे बोर्डाने कळवले आहे. पालकांनी त्यांचे पाल्य आजारी नाही ना याची शहानिशा करणे आवश्यक असल्याचे बोर्डाने म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment