मी उद्धव ठाकरे.. अखेर उद्धव ठाकरेंनी घेतली आमदारकीची शपथ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अखेरीस विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतल्याने ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद राहणार की जाणार? याबाबतच्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत इतर आठही नवनिर्वाचित विधान परिषद सदस्यांनीही आमदारकीची शपथ घेतली.

आज दुपारी १ वाजेच्या सुमारास विधानभवनात उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर त्यांना विधानपरिषद सदस्यत्वाचं प्रमाणपत्रंही देण्यात आलं. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे याही उपस्थित होत्या. कोणताही गाजावाजा न करता मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला.

उद्धव ठाकरे यांनी २७ नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे त्यांना ६ महिन्याच्या आत कोणत्या तरी एका सभागृहाचं सदस्य होणं बंधनकारक होतं. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं विधानपरिषदेच्या आगामी निवडणुका स्थगित केल्यानं. उद्धव ठाकरेंपुढे आपली मुख्यमंत्रीपद वाचवण्याचा पेच निर्माण झाला होता. मात्र, अखेर राज्यपालांच्या मध्यस्तीनं निवडणूक आयोगानं निवडणुकीला परवानगी दिली. त्यानुसार २१ मे ला निवडणुका पार पडत उद्धव ठाकरेंची विधानसभा सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली. त्यामुळं २७ मे रोजी ६ महिने पूर्ण होत असल्याने त्यापूर्वीच ते विधानपरिषदेचे सदस्य झाल्याने मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment