CAA कायद्या विरोधात कोल्हापूरात हजारो नागरिकांचा एल्गार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूरात हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून CAA, NRC आणि NPR विरोधात एल्गार पुकारला आहे. श्रीमंत छ्त्रपती शाहू महाराज , जेष्ठ नेते एन. डी. पाटील, जेष्ठ विचारवंत गणेश देवी, जेष्ठ विचारवंत जयसिंगराव पवार , महापौर निलोफर आजरेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या मोर्चाचे नेतृत्व केल.

कोल्हापूरच्या दसरा चौकात सकाळ पासून हजारो नागरीक एकत्र जमले होते. कुणी भगवे फेटे, कुणी हातात तिरंगा झेंडा तर कोणी NRC कायदा विरोधाचे फलक घेऊन या मोर्चात सहभागी झाले होते. NRC कायदा विरोधासाठी भर उन्हातही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी संविधान बचाव देश बचाव चा नारा देण्यात आला.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment