फुकटात सिगरेट न दिल्याने युवकाचा टपरी चालकावर हल्ला! CCTV फुटेज आले समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उल्हासनगर : हॅलो महाराष्ट्र – उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका ग्राहकाने टपरी चालकाच्या डोक्यात बियरच्या बाटल्या फोडल्या आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुकटात सिगारेट न दिल्यानं एका ग्राहकाने संतापाच्या भरात टपरी चालकावर जीवघेणा हल्ला केला आहे. ही घटना उल्हासनगरच्या (Ulhasnagar) कॅम्प चारमधील संभाजी चौकात घडली आहे. संभाजी चौकात मनीष पान शॉप नावाची पानटपरी आहे. या टपरीवर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास एक तरूण फुकटात सिगरेट मागण्यासाठी आला. मात्र टपरी चालकाने त्याला फुकटात सिगरेट देण्यास नकार दिल्याने या तरुणाच्या दुसर्‍या एका साथीदाराने तिथे येऊन टपरी चालकाच्या दिशेनं बियरच्या दोन बाटल्या फेकल्या. यातली एक बाटली टपरी चालकाने हातावर झेलली. तर दुसरी बाटली ही टपरी चालकाच्या डोक्यात जाऊन फुटली.

https://twitter.com/ssidsawant/status/1527830282908606464

घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
या हल्ल्यात टपरी चालकाच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्या सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी तरुणाचा शोध घेत आहेत.

बाटली थेट डोक्यावर आदळली!
या व्हिडिओमध्ये हल्लेखोराने दोन बिअरच्या बाटल्या टपरी चालकावर भिरकावल्याचे दिसत आहे. त्याने अत्यंत वेगान काचेच्या बाटल्या दुकानावर भिरकावल्या. यातील एका बाटलीचा वार टपरी चालकाने चुकवला पण दुसरी बाटली वेगानं टपरी चालकाच्या दिशेने भिरकावली गेली आणि थेट ती टपरी चालकाच्या डोक्यावर जाऊन आदळली. या हल्ल्यात टपरी चालक गंभीर जखमी झाला आहे.

हे पण वाचा :

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

कुठे फेडाल ही पाप, वर गेल्यावर तुम्हांला नरकातच जावं लागेल : अजित पवार

…तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल की काय?; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

शेवटी भांड्याला भांडे हे लागणारच…; नाना पटोलेंच्या टीकेवर अजितदादांचे प्रत्युत्तर

अजित पवार पहाटेच्या शपथविधीवर कधी बोलणार?; नाना पटोलेंनी अजितदादांना डिवचलं

 

Leave a Comment