सामुदायिक नमाज पठणाने सातारा जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

प्रेम आणि बंधुभावाचे प्रतीक असलेली रमजान ईद मंगळवारी सातारा शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी जिल्ह्यात ठिकठिकाणी मुस्लीम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केले. सातारा शहरातील ईदगाह मैदानासह विविध मशिदीमध्ये मुस्लीम बांधवांनी नमाज पठण करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

एक महिन्याचे रोजा सोमवारी संपल्यामुळे जिल्ह्यातील सातारा शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 200 हुन अधिक ठिकाणी रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मशिदींवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शहरात विविध सार्वजनिक ठिकाणी “ईद मुबारक’ असे शुभेच्छांचे फलक लावण्यात आले होते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. मुस्लीम बांधवांनी शहरातील विविध मशिदीमध्ये एकत्र येत नमाज पठण केले.

मुस्लीम धर्मियांसाठी रमजान ईद हा वर्षातील सर्वात मोठा व पवित्र सण असतो. गेल्या वर्षी रमजान ईदच्या वेळी राष्ट्रव्यापी लॉकडाऊन असल्याने ईद साधेपणाने साजरी करण्यात आली होती. यंदा राज्य सरकारकडून सर्व सणांवरील निर्बंध हटवण्यात आल्यामुळे आज जिल्ह्यात ईद उत्साहात साजरी करण्यात आली.

सातारा शहरातील पोवई नाका मस्जिद, एस. टी. स्टैंड मस्जिद, पोलीस हेडक्वार्टर मस्जिद, शाही मस्जिद, मर्कज (खड़ा मस्जिद), कसाब मस्जिद (गुरुवार परज), मदीना मस्जिद (शनिवारा), मक्का मस्जिद (बुधवारा), बेगम म मस्जिद (माची पेठ), संगमनगर मस्जिद, पिरवाड़ी मस्जिद, कब्रस्तान मस्जिद येथे रमजान ईदनिमित्तचे मुस्लीम बांधवांनी नमाज पठण केले. या बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. प्रत्येक मशिदीच्या परिसरात पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. रमजाननिमित्त बाजारपेठाही विविध मिठाई तसेच भेटवस्तूंनी फुलल्या होत्या.

Leave a Comment