कोविडचे नियम पाळून शिवजयंती साजरी

औरंगाबाद । शिवसेना शाखा ज्योतीनगर, आनंद दिघे मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने शांतगंगा कॉम्प्लेक्स, दशमेशनगर येथे तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बुधवारी शिवप्रभूंच्या प्रतिमेचे पूजन माजी नगरसेवक गिरजाराम हाळनोर व धर्मवीर आनंद दिघे मंडळाचे अध्यक्ष सदानंद शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी नगरसेविका सुमित्रताई हाळनोर, विभागप्रमुख सुधीर चौधरी, उपविभाग प्रमुख अविनाश कुलकर्णी, शाखाप्रमुख महेंद्र जहागिरदार, प्रा संतोष बोर्डे, मंगेश कपोते, प्रमोद जोशी, शिवप्रकाश मिटकरी, प्रकाश मगारे, रोहन शेळके, अशोक गायकवाड, पंडित सोनवणे, नारायण गाडेकर, अंबादास क्षीरसागर, विनोद कुंकलोळ, मनोज सोनी, मनियार, महावीर, रवी महाजन, कुणाल खडके, अनिल दिका, जया गौडा, अजय वळसे, सुधीर बाहेकर, महेंद्र पळसकर, रोहित व राहुल हाळनोर, सुनीला क्षत्रिय, गीता राठोर, पद्मा नीळकंठ व स्थानिक नागरिकांची कोविड 19 चे नियम पळून उपस्थिती होती.

शिवसेना शाखा ज्योतीनगर, आनंद दिघे मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी सामाजिक. धार्मिक कार्यक्रम राबविण्यात येत असतात. मात्र कोरोनामुळे चालू वर्षी नियमाचे पालन करून शिवजयंती साजरी करण्यात आली.

You might also like