Wednesday, June 7, 2023

महामानव चेन्नईत पोहोचला; हटके ट्विट करत आरसीबीने केलं डीविलीर्सचं स्वागत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 ला काही दिवसच शिल्लक राहिले असून सर्व संघांनी तयार सुरू केली आहे. आयपीएलचा पहिला सामना गटविजेत्या मुंबई इंडिअन्स आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघात आहे. दरम्यान आरसीबीचा धडाकेबाज खेळाडू एबी डीविलीर्स संघात दाखल झाला असून आरसीबीने खास ट्विट करत त्याच स्वागत केले आहे.

महामानव चेन्नईत पोहोचला, असं ट्विट करुन डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये धमाल करण्यास सज्ज असल्याचं एक प्रकारे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सांगितलं आहे. मागील अनेक सिझन डिव्हिलियर्स बंगळुरुकडून खेळतो. बंगळुरुसाठी तो अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे.

एबी डीविलीर्स आणि विराट कोहली हे बंगळुरूचे आधारस्तंभ असून कोणत्याही परिस्थितीत यंदाची आयपीएल जिंकण्याचाच दोघांचा प्रयत्न असेल. आरसीबीचा पहिला सामना बलाढ्य मुंबई इंडियन्सशी असून आरसीबी साठी ही मॅच नक्कीच सोपी नसेल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group