सैन्यदलात कर्तव्य बजावणाऱ्या जवानाचा ऑनलाईन वाढदिवस साजरा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणुन ओळखला जातो. जिल्हयातील अनेक तरुण देशसेवा बजावत आहेत. यामुळे या जवानांना आपल्या कुटुंबासमवेत कोणतेही सण, कौंटुबिक कार्यक्रम, वाढदिवस साजरा करता येत नाहीत. मात्र साताऱ्यातील वैभव बाबुराव माने यांचा 29 वा वाढदिवस जवानाच्या कुटुंबाने अनोखा ऑनलाईन वाढदिवस साजरा केला.

जवान वैभव माने यांच्या वाढदिवसाला ऑनलाईन शुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचा क्षण असतो. मात्र जवानांना कर्तव्य बजावत असताना. या दिवशी आपल्या कुटुंबाची कमी जाणवत असते, हि कमी भासु नये यासाठी व्हिडिओ काॅल द्वारे जवानाच्या कुटुंबानेच त्यांच्या एक वर्षाच्या लहान मुलगी वसुंधा हिच्या हस्ते केक कापुन जवानाला सुखद धक्का दिला आहे.

सातारा देवी काॅलनी येथील रहिवाशी असलेले वैभव माने सध्या छत्तीसगड येथे लष्करात सेवा बजावत आहेत. गेली 10 वर्षे ते भारतीय सैेन्यदलात कार्यरत आहेत.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment