अशा अनोख्या पद्धतीने साजरी केली जाते ‘त्या’ गावची यात्रा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे
खानापूर तालुक्यातील नागनाथनगर नागेवाडी येथील ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान श्री नागनाथ देवाच्या यात्रेला मोठी परंपरा आहेे. या यात्रेनिमित्त होणारा गेल्या दोनशे वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि संपूर्ण देशभर प्रसिध्द असलेला बगाड पळविण्याचा सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत नागनाथाच्या नावानं चांगभलंच्या गजरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
गुढीपाडव्या दिवशी सर्व गावकरी मंदिरात एकत्रित येवून लिंब खाण्याचा सामूदायिक कार्यक्रम पार पडतो. त्यानंतर सर्व जातीधर्माचे लोक व मानकर्‍यांनी एकत्रित येवून बगाडाच्या बांधणी केली. यात्रेचा आज मुख्यदिवस असल्याने सकाळी श्रींच्या मुर्तीस स्नान, अभिषेक, पोशाख, धूपारती करण्यात आली. त्यानंतर चांदीचा रत्नजडीत मुकुट व दागिन्यांनी देवाला सजविले जाते. सालंकृत विधीवत पूजा बांधली जाते. याच दिवशी भाविक नवसाचे पोशाख देवाला आहेर स्वरुपात अर्पण केले जात होते.
येथील बगाड पळविण्याच्या सोहळा संपूर्ण देशभरात प्रसिध्द आहे. नागनाथनगर परिसरातील पाहुण्यांचे, तालुक्यातील भाविकांचे नवसाच्या सुमारे १५० बैलजोड्या बगाड पळविण्यासाठी दाखल झाल्या होत्या. सायंकाळी चार  वाजल्यापासून परंपरा असणार्‍या बगाड पळविण्याच्या सोहळ्यास सुरुवात झाली. एका बैलजोडीस मंदिराभोवती बगाडाचा एकच फेरा देण्यात येत होता. उंचच्या उंच शिड असणार्‍या दगडी चाके असलेल्या बगाडांना बैलजोडीला जुपून पळविण्याचा सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. बगाड पळविण्याच्या सोहळ्यावेळी भाविकांनी गुलाल व भंडार्‍याची उधळण करत केलेल्या नागनाथाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषाने संपूर्ण नागनाथनगरी दुमदुमने गेली होती.

Leave a Comment