सिमेंटचे दर ‘इतक्या’ रुपयांनी वाढण्याची शक्यता; Flate, Real Estate महागणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आगामी काळात तुम्ही जर घर बांधण्याची तयारी करत असाल आणि त्यासाठी बजट काढत असाल तर तुमच्या बजेट मध्ये गडबड होऊ शकते. याचे मुख्य कारण म्हणजे आता सिमेंटच्या किमतीत लक्षणीय वाढ होणार आहे. सिमेंटच्या दरात 25 ते 50 रुपयांनी वाढणार असल्याची माहिती समोर येत आहे.

क्रिसिलने जारी केलेल्या अहवालानुसार, रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे सिमेंटच्या किमतीत वाढ होत आहे. गेल्या एका वर्षात सिमेंटच्या दरात प्रति पोती 390 रुपयांनी वाढ झाली आहे, असे असतानाही दरवाढीचा सिलसिला सुरूच असून आता प्रति पोती 25 ते 50 रुपयांनी वाढ होणार असल्याची शक्यता आहे . असे झाल्यास घर बांधताना तुम्हाला अधिक खर्च सहन करावा लागू शकतो कारण दगडी बांधकामापासून टाइल्सपर्यंत आणि मोल्डिंगपासून प्लास्टरिंगपर्यंत सर्वत्र सिमेंटचा वापर केला जातो.

तज्ज्ञांच्या मते, सिमेंटच्या किमती वाढण्यामागे दोन मुख्य कारणे आहेत, पहिले म्हणजे कच्चे तेल आणि दुसरे म्हणजे कोळस. मार्चमध्ये कच्च्या तेलाची किंमत सरासरी 115 डॉलर प्रति बॅरल होती, तर दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाच्या किमतीत वाढ झाली आहे.

इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियाने देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे कोळशाच्या निर्यातीवर निर्बंध लादले आहेत आणि त्यामुळे वीज आणि इंधन या दोन्हींच्या किमती वाढल्याने सिमेंटच्या किमतीत वाढ होत आहे. डिझेलच्या दरात वाढ झाल्याने सिमेंटची वाहतूक महाग झाली असून, त्याचा परिणाम सिमेंटच्या दरावर दिसून येत आहे.