केंद्राची मोठी घोषणा! लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे देशातील वेगवेगळ्या राज्यात अडकलेल्या परप्रांतीय मजूर, विद्यार्थी, पर्यटकांच्या आंतरराज्यीय वाहतुकीसाठी बस सोबत आता स्पेशल ट्रेन सुरु करण्यालाही केंद्रीय गृहमंत्रालयाने हिरवा कंदील दिला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत ही ट्रेन सेवा सुरु करण्यात येणार आहे. ट्रेन सेवा सुरळीत व्हावी यासाठी राज्य सरकारांमध्ये समनव्य राहावा यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे.

तिकिटांच्या विक्रीसंबंधी रेल्वे मंत्रालय सविस्तर माहिती देईल असं आदेशात सांगण्यात आलं आहे. तसंच ट्रेन आणि स्थानकांवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्यासंबंधी तसंच सुरक्षेच्या इतर उपाययोजनांबद्दलही रेल्वे मंत्रालयाकडून सूचना जारी करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून देशातील अनेक राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी राज्यात अडकून पडलेल्या कामगारांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी विशेष ट्रेन सोडावी अशी मागणी केली होती. अखेर केंद्र सरकारने परवानगी देत अडकलेल्या कामगारांना मूळ राज्यांत परत पाठवण्यासाठी रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या नव्या निर्णयामुळे सुमारे ४० दिवस अडकून पडलेल्या मजुरांना मोठा दिलासा मिळाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.