खुशखबर! केंद्राच्या सशस्त्र पोलीस दलात ‘एवढ्या’ पदांची भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पोटापाण्याची गोष्ट |पोलीसी पेशाची क्रेज असणारांना खुशखबर! केंद्र सरकारच्या सशस्त्र पोलीस दलात नव्याने ३२३ पदांची भरती निघाली आहे.  यासाठी आपल्याला ऑनलाईन आवेदन भरायचे असून हि  परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजे UPSC मार्फत घेण्यात येते.

संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सहाय्यक कमांडंट) परीक्षा २०१९ या नावाने हि परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेच्या संदर्भात जाहिरात UPSCच्या अधिकृत संकेत स्थळावर प्रकाशीतकरण्यात आली आहे.

या परीक्षेसाठीच्या पात्रतेच्या अटी

शैक्षणिक पात्रता : या परीक्षेला बसू इच्छिणारा व्यक्ती कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा

वयाची अट : १ ऑगस्ट २०१९ रोजी वय  २० ते २५ या वयो गटात असणे आवश्यक. तसेच अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) दोन प्रवर्गासाठी ५ वर्षांची वयाच्या अटीत सवलत देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे इतर मागास प्रवर्ग (OBC) साठी ३ वर्षांची वयाच्या अटीत सवलत देण्यात आली आहे.

याही बाबी लक्षात ठेवा

सशस्त्र पोलीस दल (सहाय्यक कमांडंट) हे पद केंद्र सरकारची सेवा असल्याने पदाचे कार्यक्षेत्र पूर्ण भारतभर असणार आहे.

या परीक्षेचे आवेदन ऑनलाईन पद्धतीने भरायचा असून यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेत स्थळाला भेट द्यावी लागणार आहे.

या परीक्षेचे शुल्क खुला प्रवर्ग आणि ओबीसी वर्गासाठी २०० रुपये आकारण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे SC, ST , महिला या प्रवर्गासाठी परीक्षेचे शुल्क आकारले जाणार नाही.

या तारखा लक्षात ठेवा 

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सहाय्यक कमांडंट) परीक्षा २०१९या परीक्षेसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख २० मे २०१९

तर परीक्षेची तारीख १८ ऑगस्ट २०१९असणार आहे.

UPSCच्या अधिकृत संकेत स्थळावरील परीक्षेची जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

Notification – Click Here

महत्वाच्या बातम्या

बँकेत नोकरी करायची आहे ! मग हि संधी सोडू नका

“सर, पण UPSC/MPSC चा अभ्यास नेमका करायचा कसा…?”

SSC GD तसेच निमलष्करी दलांमध्ये ७६ हजार जागांची भरती होणार

बारावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी CISF मध्ये ४२९ जागांची भरती

 

Leave a Comment