राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा व विधानपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानांतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले. भाजपश महा विकास आघाडी सरकारने आपापले उमेदवारही दिले. त्यानंतर आता देशातील सर्वात महत्वाच्या अशा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची नुकतीच घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. पुढील महिन्यात 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान पार पडणार आहे.

सध्याचे राष्ट्रपती असलेले रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आता राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक लागणार असून केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत राष्ट्रपती निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 15 जून ते 29 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर 2 जुलै पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. निवडणूक बिनविरोध न झाल्यास 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीसाठी संसदेचे खासदार आणि विधानसभेचे आमदार या निवडणुकीसाठी मतदान करतात. मागील वर्षी झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जवळपास 50 टक्के मतदान एनडीएचे उमदेवार रामनाथ कोविंद यांच्या बाजूने झाले होते. काही प्रादेशिक पक्षांनीदेखील कोविंद यांना पाठिंबा दिला होता.

असा आहे राष्ट्रपती निवडणूक कार्यक्रम?

1) नोटिफिकेशन जारी : 15 जून 2022

2) अर्ज करण्याचा शेवटचा दिवस : 29 जून 2022

3) अर्ज छाननी : 30 जून 2022

4) अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस : 2 जुलै 2022

5) मतदानाचा दिवस : 18 जुलै 2022

6) प्रत्यक्ष मतमोजणी : 21 जुलै 2022

 

उमेदवारास काय आहेत निकष ?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारासाठी काही पात्रता निकष ठेवण्यात आलेले आहेत. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार हा भारतीय नागरीक असावा आणि त्याचे वय 35 हून अधिक असावे. त्याशिवाय, त्याला किमान 100 आमदार, खासदारांचा पाठिंबा असावा. यामध्ये 50 सूचक आणि 50 अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करतात. हे आमदार, खासदार थेट निवडून आलेले प्रतिनिधी असावेत.

Leave a Comment