व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार डबल बोनस, किती सॅलरी मिळेल ते जाणून घ्या

नवी दिल्ली । सरकारने दीड वर्षासाठी महागाई भत्त्याची (DA) थकबाकी दिलेली नाही. यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यात थोडा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याच्या सॅलरीमध्ये दुप्पट बोनस मिळू शकेल. आज तुम्ही तुमच्या बँक खात्यात येणाऱ्या सॅलरीचे SMS तपासावेत की, सॅलरीमध्ये DA आणि HRA वाढ झाली आहे की नाही. सरकारने लाखो कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी 28 टक्के केली आहे आणि घरभाडे भत्ता (HRA) देखील वाढवला आहे.

केंद्र सरकारने आदेश जारी करताना म्हटले आहे की,’सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीच्या आधारावर घरभाडे भत्ता आणि DA वाढवण्यात यावा. या नियमांनुसार, HRA वाढविण्यात आले आहे कारण DA 25%पेक्षा जास्त आहे. या कारणास्तव, केंद्र सरकारने HRA वाढवून 27% करण्याचा निर्णय घेतला आहे.

HRA मध्येही सुधारणा केली जाईल
7 जुलै 2017 रोजी, एक्सपेंडिचर विभागाने एक आदेश जारी केला होता ज्यामध्ये म्हटले गेले होते की, जेव्हा DA 25% पेक्षा जास्त असेल तेव्हा HRA मध्ये देखील सुधारणा केली जाईल. 1 जुलै पासून महागाई भत्ता 28%पर्यंत वाढला आहे, त्यामुळे आता HRA मध्ये सुद्धा सुधारणा करणे आवश्यक आहे. शहराच्या कॅटेगिरीनुसार 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के HRA दिले जात आहे. 1 जुलै 2021 पासून DA सोबत ही वाढ देखील लागू करण्यात आली आहे. घर भाडे भत्ता (HRA) ची कॅटेगिरी X, Y आणि Z वर्गाच्या शहरांनुसार आहे. याचा अर्थ असा होतो की, X वर्गात येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दरमहा 5400 रुपयांपेक्षा जास्त HRA मिळेल. यानंतर Y वर्ग कर्मचाऱ्यांना 3600 रुपये दरमहा आणि नंतर Z वर्ग कर्मचाऱ्यांना 1800 रुपये दरमहा मिळतील.

कर्मचाऱ्यांची मिनिमम बेसिक सॅलरी 18,000 रुपये आहे
7 व्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची मिनिमम बेसिक सॅलरी 18,000 रुपये आहे. सध्या खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी 15,000 रुपयांपासून सुरू होते. 18,000 रुपयांच्या या बेसिक सॅलरीवर, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जून 2021 पर्यंत 17% दराने 3060 रुपये DA मिळत होता. जुलै 2021 पासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 28 टक्के दराने 5,040 रुपये दरमहा DA मिळणार आहेत. आता कर्मचाऱ्यांचे मंथली सॅलरी 1,980 रुपयांनी वाढली आहे.