हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नाशिक म्हणलं की आपल्याला आठवतो तो कुंभमेळा. यासाठी देशातून ठीक – ठिकाणहून लोक येत असतात. त्याच पार्शवभूमीवर 2027 ला होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या रेल्वे कोच डोपोची निर्मिती करण्यासाठी केंद्राने तब्बल 50 कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे होणाऱ्या कुंभमेळ्याला याचा फायदा होणार आहे.
का उभारण्यात येणार डेपो?
नाशिक मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ही तयारी सुरु असल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर कुंभमेळ्यासह इतरही वेळेत रेल्वे कोचची निगा राहावी यासाठी तसेच ही दुरुस्ती होऊन रेल्वे कोचचा मेंटेनन्स हा वेळेवर होण्यासाठी नाशिकला कोच दुरुस्ती, मेंटेनन्स डेपो उभारला जात आहे. त्यामुळे याचा फायदा हा चांगलाच होईल अशी आशा आहे.
50 कोटींचा निधी मंजूर
नाशिक येथे हा डेपो उभारण्यासाठी खासदर हेमंत गोडसे हे प्रयत्नशील होते. ही मागणी न्यायिक असल्यामुळे यासाठी केंद्राने तब्बल 50 कोटींचा निधी मंजूर केला आहे. गोडसेंनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुंबई, भुसावळ आणि दिल्लीच्या रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत डेपो निर्मिती ही किती गरजेची आहे हे दाखवून देत डेपो निर्मितीसाठी पावले उचलण्यास सांगितले.
काय फायदा होईल डेपो निर्मिती झाल्यावर?
नाशिक मध्ये डेपो निर्मिती झाल्यावर रेल्वेच्या रोजगारावर याचा परिणाम होणार आहे. रोजगार निर्मितीस वाव मिळणार आहे. तसेच रेल्वे कोचच्या निर्मितीमुळे नाशिकच्या उद्योगात भर पडणार आहे. त्यामुळे रेल्वे कोचच्या मेंटेनन्ससाठी याची मागणी करण्यात होती. नाशिकला होणाऱ्या 2027 च्या कुंभमेळाव्यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे. तसेच यामुळे राज्यात असलेल्या विविध मालगाड्या तसेच प्रवासी गाड्यांच्या मेंटेनन्सची कामे जलद गतीने होणार आहेत. यासाठी निधी मान्य झाला आहे. तो अंतिम मान्यतेसाठी रेल्वे बोर्डाकडे लवकरच जाईल असे हेमंत गोडसे यांनी सांगितले आहे.