हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यामध्ये तंबाखू यांसारख्या पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु आता देशातील तसेच राज्यातील शैक्षणिक संस्थामध्ये आता तंबाखू वर्ज केली जावी. यासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. यासाठी आता केंद्रीय शिक्षण मंत्री आणि आरोग्य मंत्रालयाने केलेली आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशात आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तंबाखूमुक्ती नियमांचे पालन केले जावे, असे सांगण्यात आलेले आहे.
आरोग्य आणि शिक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे ही सूचना जारी केलेली आहे. आणि या मार्गदर्शक सूचनांमध्ये तंबाखू सेवनामुळे लहान मुलांवर आणि तरुणांवर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. सरकारने 2019 सालचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामध्ये त्यांनी असे म्हटलेले आहे की ग्लोबल युथ सर्वेक्षण 2019 नुसार 13 ते 15 वयोगटातील जवळपास 8.5 टक्के मुले ही तंबाखूचे सेवन करतात. म्हणजेच जवळपास 5500 लहान मुले तंबाखूचे सेवन करतात. ही अत्यंत चिंतादायक बाब आहे.
देशातील शिक्षण संस्थांचे सर्वेक्षण केल्यानंतर असे लक्षात आले की, जवळपास 20 वर्षाच्या आधीच 55% मुले हे तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन करतात. तसेच यामुळे त्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक शैक्षणिक दृष्ट्या देखील खूप तोट्याचे मानले जाते. तंबाखू फ्री एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मॅन्युअलचे महत्वपूर्ण सूचनेत सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे आता तंबाखू विरोधी धोरणांचे त्यांना अंमलबजावणी करता येणार आहे. केंद्र सरकारने 31 मे म्हणजेच तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने सोसिओ इकॉनोमिक एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटीच्या सहकार्याने हे धोरण जारी केलेले आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये पूर्णपणे तंबाखू गरजे केली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे देखील कोणत्याही प्रकारचे व्यसन करत नाही याची खात्री केली जाणार आहे.