Wednesday, October 5, 2022

Buy now

केंद्र सरकारने संपवले वर्क फ्रॉम होम, खासगी कंपन्या ऑफिस कधी उघडणार ?

नवी दिल्ली । देशात कोविड-19 चे रुग्ण आता कमी होत आहेत. त्यादृष्टीने शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. केंद्र सरकारने आता आपल्या कर्मचार्‍यांचे वर्क फ्रॉम होम संपवले आहे आणि सर्व कर्मचार्‍यांना ऑफिस मधून काम करण्यास सांगितले आहे. सरकारी शैक्षणिक संस्था आणि ऑफिस पूर्ण सुरू झाल्यानंतर देशातील टीसीएस, विप्रो, इन्फोसिस आणि एचसीएलसह इतर कंपन्यांमध्ये ऑफिस मधून काम कधी सुरू होणार, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. खाजगी कंपन्यांनी अजूनही आपले ऑफिस उघडण्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही आणि त्यांचे बहुतांश कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत.

अलीकडेच केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्री जितेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वर्क फ्रॉम होम संपवून केंद्रीय कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की,”आता सर्व कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये यावे लागेल. मात्र ऑफिसमध्ये कोविड-19 नियमांचे पूर्णपणे पालन केले जाईल.”

ऑफिस कधी उघडणार ?
टीसीएस, विप्रो, इन्फोसिस आणि एचसीएल यांसारख्या मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये ऑफिस मधून काम कधीपासून लागू केले जाईल याची कोणतीही माहिती या कंपन्यांनी अद्याप दिलेली नाही. अशी अपेक्षा आहे की, कोविड -19 च्या प्रकरणांमध्ये घट झाली आहे आणि सरकारकडून कोविड निर्बंधांमध्ये दररोज शिथिलता आल्याने आयटी कंपन्या देखील लवकरच आपले ऑफिस उघडतील.”

TCS जानेवारीमध्ये ऑफिस सुरू करणार होते
गेल्या वर्षी, कोविड-19 चे ओमिक्रॉन व्हेरिएन्ट येण्यापूर्वी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने वर्क फ्रॉम होम पूर्ण केले होते आणि ऑफिस उघडण्याची तयारी केली होती. जानेवारीपासून कंपनीचे कर्मचारी ऑफिसमध्येयायला सुरुवात करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ओमिक्रॉनमुळे हे प्लॅनिंग फसले. डिसेंबर 2021 मध्ये, कंपनीने सांगितले की,”Omicron चा प्रसार पाहता, कंपनी योग्य विचार केल्यानंतर कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावण्याचा निर्णय घेईल. डिसेंबरमध्ये कंपनीचे 90 टक्के कर्मचारी घरून काम करत आहेत.”

HCL कोरोनाच्या प्रभावाकडे पाहत आहे
एचसीएल टेक्नॉलॉजीज (HCL) ने कोविड-19 चे ओमिक्रॉन आल्यावर कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावण्याची योजना पुढे ढकलली होती. त्यानंतर कंपनीने सांगितले होते की,”कोविड-19 च्या ओमिक्रॉनच्या परिणामांचे मूल्यांकन केल्यानंतरच ऑफिस पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल.” कंपनीचे म्हणणे आहे की,”त्यासाठी त्यांचे कर्मचारी, कंत्राटदार आणि त्यांचे कुटुंबीय यांना पहिले प्राधान्य आहे. जोपर्यंत धोका पूर्णपणे टळत नाही तोपर्यंत कंपनी घरून काम करण्याला प्राधान्य देईल.”

इन्फोसिस दीर्घकाळापासून वर्क फ्रॉम होमच्या बाजूने आहे
कोविड-19 मुळे बदललेल्या परिस्थितीत इन्फोसिसनेही वर्क फ्रॉम होमला प्राधान्य दिले आहे. इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, इन्फोसिसचे एचआर प्रमुख रिचर्ड लोबो म्हणतात की,” कंपनी आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देईल.” लोबो यांच्या मते, कंपनीला विश्वास आहे की, कामाचे हे हायब्रीड मॉडेल पुढील अनेक वर्षांसाठी लागू होईल. यामुळे अशी अपेक्षा आहे की, इन्फोसिस आपल्या कर्मचार्‍यांना ऑफिसमध्ये बोलावणार नाही किंवा वर्क फ्रॉम होम लवकर संपवणार नाही.