केंद्र सरकारने तत्काळ मागे घेतला ‘हा’ निर्णय; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची ट्विटवरून माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्र सरकारने छोट्या बचत योजनांवर व्याज दर कमी करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. वित्त मंत्री निर्मला सितारामन यांनी ट्विट करून ही माहिती दिली. काल अशी माहिती मिळाली होती की वित्तीय वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहितील छोटया योजनांवरील व्याज दर कमी करण्यात येणार आहेत. परंतु, तो निर्णय चुकून घोषित झाला असून आता तो निर्णय मागे घेतला गेला आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

केंद्रीय वित्तमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,”भारत सरकारच्या छोट्या बचत योजनांचा व्याजदर हा आधी सारखाच असेल. जो व्याजदर 2020-22 च्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत व्याजदर होता, तोच व्याजदर यापुढेही लागू राहील.” PPF सोबत छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात सर्वाधिक 1.1% कपात ही एक वर्ष जमा असलेल्या मुदत ठेवींवर केली गेली होती. अश्याप्रकारे, 2 वर्ष जमा आलेल्या मुदत ठेवींवर 0.5% कपात करून 5%, 3 वर्ष जमा असलेल्या मुदार ठेवींवर 0.4% कपात तर 5 वर्ष जाम असलेल्या मुदत ठेवींवर व्याजदर 0.9% कमी करून 5.8% केला गेला होता.

सरकारने बुधवारी PPF आणि NSC सोबत छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात 1.1% ने कपात केली होती. वित्त मंत्र्यांच्या अधिसूचनेनुसार PPF वर व्याजदर 0.7% कमी करून 6.4% आणि NSC वर 0.9% व्याजदर कमी करून 5.9% करण्याची घोषणा केली होती. पंच वार्षिक जेष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर 0.9% कमी करून 6.5% केला होता. ह्या योजनेअंतर्गत व्याज तिमाही आधारावर दिले जाते. पहिल्या वेळेस बचत खात्यामधील जमा रकमेवर व्याज 0.5% कमी करून 3.5% केले होते.

You might also like