हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | या दिवाळीत मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. सेवानिवृत्तीच्या वयासंदर्भात केंद्र शासनाने माहिती दिलेली आहे. ती म्हणजे आता केंद्रशासन हे कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढण्याबाबत सकारात्मक विचार करत आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तेचे वय वाढू शकते.
सध्या केंद्र कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे एवढे आहे. परंतु या वयामध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य शासकीय सेवेत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याबाबत सरकार पाठपुरावा करत आहे. राज्य सरकार देखील या निर्णयाबाबत सकारात्मक विचार करत आहे. परंतु याबाबत अजूनही कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.
या सगळ्या परिस्थितीचा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय आणखी दोन वर्षांनी वाढणार असल्याची चर्चा सुरू आहे. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वय हे 60 वर्षा वरून 62 वर्ष केले जाऊ शकते. अशी माहिती समोर आलेली आहे. या वय वाढीबाबत केंद्रीय कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून सरकारकडे वेळोवेळी मागणी करण्यात आलेली आहे. आणि या मागणीवर आता केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेणारा असल्याचे समोर येत आहे. सरकारने जर याबाबत सकारात्मक निर्णय घेतला, तर केंद्र शासनाच्या अधिनस्त असणाऱ्या जवळपास 23 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय जर 62 वर्ष झाले, तर महाराष्ट्र राज्य सरकार शासकीय सेवेत असणारी कर्मचारी देखील सेवानिवृत्तीचे वय वाढण्याबाबत आणखी आक्रमक होतील. कारण त्यांच्या सेवानिवृत्तीचे वय अजूनही 60 वर्ष झालेले नाही. गेल्या अनेक वर्षापासून राज्य कर्मचाऱ्यांची वय हे 58 वर्षावरून 60 वर्षे व्हावे यासाठी पाठपुरावा करत आहे. परंतु अजूनही त्यांच्या या मागणीला यश आलेले नाही.