मुंबई । केंद्र सरकारच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) या पाणबुडी व नौका उभारणी कंपनीत कर्मचाऱ्यांमध्ये नोकरीसंदर्भात चिंता निर्माण झाली आहे. जळपास एक हजार कर्मचाऱ्यांचे कंत्राट जानेवारीमध्ये संपत आहे. याशिवाय येथील कारखान्यात होणारी बरीचशी काम गुजरातमधील कंपन्यांना आऊटसोर्स केल्यामुळं येत्या काळात माझगाव डॉकमध्ये कर्मचारी कपात होऊन अनेकनाच्या नोकरीवर गदा येण्याची भीती आहे.
एमडीएल कंपनीमध्ये सध्या तीन अत्याधुनिक पाणबुड्या, तीन विनाशिका व तीन फ्रिगेट्सची उभारणी जोमाने सुरू आहे. त्यासाठी जवळपास साडेतीन हजार कर्मचारी कार्यरत असले तरी स्थायी कर्मचारी खूप कमी आहेत. त्यामुळे कंत्राटावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर नोकरीची टांगती तलवार आहे.
कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, ‘आतापर्यंत इथल्या कारखान्यात होणारी बरीचशी कामे कंपनीने आऊटसोर्स केली आहेत. त्यामध्ये नौकेच्या लहान-लहान भागांच्या जुळवणीचा समावेश आहे. हे लहान भाग तयार होऊन कारखान्यात येतात व येथे फक्त अंतिम जुळवणी होते. मुख्य काम गुजरातच्या कंपनीला कंत्राटावर देण्यात आले आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांची गरज कमी झाली आहे. या स्थितीत कर्मचाऱ्यांना कंत्राटावरच ठेवले जात आहे. अशा ९५० ते १ हजार कर्मचाऱ्यांचे दोन वर्षांचे कंत्राट जानेवारीअखेर संपणार आहे. हे सर्व कर्मचारी साधारण चाळीशीतील आहेत. त्यांना स्थायी करण्याबाबत कुठलाही निर्णय झाला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.’
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’