Saugat e Modi : मुस्लिमांसाठी सरकारची “सौगात ए मोदी” योजना; मिळणार ‘या’ खास गोष्टी

Saugat e Modi" scheme for Muslims
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी भाजपने मोठी शक्कल लढवली आहे. सध्या सुरु असलेल्या रमजानच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सौगत-ए-मोदी (Saugat e Modi) मोहीम राबवण्याची घोषणा केलीय. याअंतर्गत देशभरातील जवळपास ३२ लाख गरीब मुसलमानांना केंद्र सरकार सौगात ए मोदी’ किट देणार आहे. जेणेकरून ईद साजरी करण्यासाठी त्यांना कुठलीही अडचण होऊ नये. ईदसाठी हे गिफ्ट गरजू मुस्लिमांसाठी वाटप केले जाईल. अल्पसंख्याक मोर्चाचे ३२ हजार पदाधिकारी देशातील ३ हजार मशि‍दींमध्ये जाणार आहेत. त्याठिकाणी ३२ लाख गरजू मुस्लीम व्यक्तींना मदत केली जाणार आहे.

याबाबत भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे १४० कोटी भारतीयांचे पंतप्रधान आहेत. सध्या सणांचा काळ आहे, ईद येत आहे, रमजान सुरू आहे. त्या निमित्ताने आमचे कार्यकर्ते मुस्लिमाना “सौगात ए मोदी” किट वाटतील. या किटमध्ये अन्नपदार्थ, घरातील महिला प्रमुखासाठी सूट साहित्य असेल. किटमध्ये सणाच्या वस्तू, शेवया, बेसन, सुकामेवा, दूध, साखर, सर्वकाही असेल. महिलांसाठी या किटमध्ये सूटचे कपडे असतील. पुरुषांसाठी किटमध्ये कुर्ता पायजमा असणार आहे. या प्रत्येक किटची किंमत ५०० ते ६०० रूपये इतकी आहे. गरीब आणि गरजू मुसलमानांना ईद साजरी करता यावी यासाठी भाजपा हा उपक्रम राबवत आहे. देशातील ३२ लाख गरजू मुस्लिमाना हे किट वाटण्यात येईल.. २ हजार अधिकारी या किटचे वाटप करतील आणि १ अधिकारी १०० कुटुंबांना हे किट वाटेल असं जमाल सिद्दीकी यांनी म्हंटल.

दिल्लीतील निजामुद्दीन येथून सौगत-ए-मोदी ही मोहीम सुरू होईल. रमजानचा पवित्र महिना गरीब, असुरक्षित शेजारी आणि नातेवाईकांना मदत करण्याचे महत्त्व अधोरेखित करतो. गुड फ्रायडे, ईस्टर, नवरोज आणि भारतीय नववर्षातही अशा प्रकारे ‘सौगत-ए-मोदी’ किटचे वाटप होईल . यामुळे जातीय सलोखा वाढेल असे जमाल सिद्दीकी यांनी म्हंटल.

अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी यासिर जिलानी म्हणाले की, ‘सौगत-ए-मोदी’ योजना ही भारतीय जनता पक्षाने मुस्लिम समुदायामध्ये कल्याणकारी योजनांचा प्रचार करणे आणि भाजप आणि एनडीएला राजकीय पाठिंबा मिळवणे या उद्देशाने सुरू केलेली मोहीम आहे. ही मोहीम रमजान आणि ईदवर केंद्रित आहे.