पालघर प्रकरणानंतर अमित शहांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पालघरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्येनंतर राजकारण तापले आहे. विरोधी पक्षांनी या घटनेवरून राज्य सरकारवर दोषारोप सुरू केले आहेत. पालघर घटनेवरुन राज्य सरकारवर टीका होत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार कारवाई करत असून जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं आश्वासन देत पालघर प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. गुन्हेगारांच्या अटकेची कारवाई करत असल्याची माहिती देत असताना या घटनेचं राजकारण केलं जाऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं. उद्धव ठाकरेंनी यावेळी पालघरच्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोन केला होता अशी माहिती दिली.

मॉब लिंचिंगची घटना जेथे घडली तेथे इतर धर्माचे लोक जवळपास राहत नसल्याची माहिती अमित शाह यांनाही आहे. त्यामुळे या घटनेचा धार्मिक संबंध नाही. अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांच्याकडे सर्व माहिती येत असते. त्यांनीदेखील यामध्ये धार्मिक रंग नसल्याची माहिती आपल्याला असल्याचं म्हटलं. त्यांनी फक्त काळजी घ्या असं सांगितलं. त्यावर आम्ही काळजी घेत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हटलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही माझं बोलणं झालं. मॉब लिंचिंग अत्यंत वाईट असल्याचं मी त्यांना म्हटलं. कारण काहीही असंल तरी महाराष्ट्रात हे सहन केलं जाणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

सोशल मीडियावरुन आग लावणाऱ्यांबद्दलही मी अमित शाह यांना सांगितलं आहे. सोशल मीडियावरुन हे आग लावणारे जे लोक आहेत त्यांचा शोध आम्ही घेत आहोत तुम्हीही घ्या असं मी त्यांना सांगितलं. कारण प्रत्यक्ष होतं एक आणि सांगितलं जातं वेगळं. पण आग लागवणाऱ्यांना त्याची झळ पोहोचत नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. पालघर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला असल्याची माहिती यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिली. तसंच धार्मिक रंग दिला नको‌ असं आवाहन करताना दोषींना शिक्षा होणार असल्याचं आश्वासन दिलं. सोशल मीडियावरून वातावरण पेटवणाऱ्यांनाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”

Leave a Comment