हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वे प्रवासी वाहतुकी बरोबरच मोठ्या प्रमाणात मालवाहतूक देखील करते. भारतीय रेल्वेच्या उत्त्पन्नाचा मोठा हिस्सा प्रवासी वाहतुकीतुन न येता मालवाहतुकीतूनच रेल्वेला मिळतो. त्यामुळे माल वाहतुकीवर सर्वच रेल्वे विभागाचे विशेष लक्ष असते. यातूनच मध्य रेल्वे विभागाने (Central Railway) सप्टेंबर महिन्यात मोठी कमाई केली आहे. मध्य रेल्वेने सप्टेंबर महिन्यात माल वाहतुकीतून एकूण 610 कोटी रुपये तिजोरीत जमा केले आहेत.
सप्टेंबर 2023 मध्ये 50.76 लाख टन मालाची वाहतुक :
मध्य रेल्वे विभागाच्या (Central Railway) माध्यमातून रेल्वेने सप्टेंबर 2023 या महिन्यात एकूण 50.76 लाख टन मालाची वाहतूक केली आहे. गेल्यावर्षी म्हणजेच सप्टेंबर-2022 मध्ये मध्य रेल्वेने 50.65 लाख टन इतकी माल वाहतूक केली होती. यावर्षी त्यामध्ये 1.90% इतकी वाढ बघायला मिळाली आहे. यातूनच मध्य रेल्वेने 610 कोटी रुपये आपल्या तिजोरीत जमा केले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर -2022 मध्ये मध्य रेल्वे केलेल्या माल वाहतुकीतून 571 कोटी रुपये आपल्या तिजोरीत जमा केले होते.
मध्य रेल्वेची सर्वोत्तम मालवाहतूक : Central Railway
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल-2023 ते सप्टेंबर-2023 या दरम्यान मध्य रेल्वेने 41.66 मेट्रिक टन मालवाहतूक केली आहे. जी की गेल्या वर्षीच्या तुलनेत 9.70% इतकी जास्त आहे. गेल्यावर्षी याचं तिमाहीत मध्य रेल्वेने 37.99 मेट्रिक टन इतका माल वाहून नेला होता. त्यामुळे मध्य रेल्वेच्या माध्यमातून केलेली ही आतापर्यंतची सर्वोत्तम मालवाहतूक ठरली आहे.