Indian Railway : अवैधरित्या AC आणि फर्स्ट क्लास मधून प्रवास करणाऱ्यांची खैर नाही ; रेल्वेने घेतला मोठा निर्णय

0
2
railway news
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Railway : सरळ, सोपा आणि सोयीस्कर प्रवास म्हणून रेल्वेच्या प्रवासाला प्रधान्य दिले जाते. मात्र बऱ्याचदा विशेषत: लांब पल्ल्याच्या गाडयांमधून प्रवास करीत असताना प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागतो. विशेषतः एसी किंवा फर्स्ट क्लास मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनधिकृतरित्या डब्ब्यात शिरणाऱ्या प्रवाशांचा त्रास होतो. मात्र आता रेल्वे प्रशासनाकडून याबाबत खबरदारी घेण्यात आली असून तुम्ही प्रवासातील समस्या आणि तक्रारी थेट रेल्वे विभागाला व्हाट्स अँप करू शकता. यासाठी एक नंबर सुद्धा जारी करण्यात आला आहे. याबाबतचे (Indian Railway) ट्विटही शेअर करण्यात आले आहे.

रेल्वेमधून प्रवास करत असताना एखाद्या प्रवाशाला अडचण असेल किंवा काही तक्रार द्यायची असेल तर हा प्रवासी थेट व्हाट्सअप द्वारे तक्रार देऊ शकतो. म्हणजेच मध्य रेल्वे कडून आता व्हाट्सअप हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे . व्हाट्सअप (Indian Railway) हेल्पलाइन मुळे आता फक्त वैध तिकीट असलेले प्रवासी एसी आणि फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करतील याची खात्री करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

काय आहे हेल्पलाईन नंबर ? (Indian Railway)

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वरिष्ठ विभागीय व्यवस्थापकांनी सोमवारी संध्याकाळी एक हेल्पलाइन नंबर शेअर केला असून. हा नंबर आहे 720881997. एसी किंवा फर्स्ट क्लास डबल मध्ये प्रवास करणारे प्रवासी आता या मोबाईल नंबर वर अनधिकृत प्रवासा संबंधीच्या तक्रारीसाठी व्हाट्सअप करू शकतात. दरम्यान, एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “व्हॉट्सॲप हेल्पलाइन ही सेवा तिकीट नियमांचे पालन (Indian Railway) सुनिश्चित करण्यासाच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.”