हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Central Railway । पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. यंदा ६ जुलैला आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्ताने वारकऱ्यांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी मध्य रेल्वेने पुणे ते मिरज आणि मिरज ते नागपूर या मार्गावर एकेरी विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. या विशेष ट्रेन मुळे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कराडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कसं असेल रेल्वेगाडीचे वेळापत्रक? Central Railway
पुणे – मिरज एकेरी विशेष रेल्वे गाडी अर्थातच गाडी क्रमांक 01413 हे आषाढी एकादशी विशेष गाडी आठ जुलै 2025 रोजी सकाळी सात वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि ही त्याच दिवशी दुपारी साडेबारा वाजता मिरज रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. ही रेल्वेगाडी लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी आणि सांगली सारख्या अनेक महत्वाच्या स्थानकावर थांबणार आहे. एकीकडे सांगली ते पुणे रस्त्याची कामे सुरु असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते, मात्र या विशेष ट्रेनमुळे या भागातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. वाहतूक कोंडीतूनही सुटका मिळणार आहे. या विशेष गाडीच्या रचनेबाबत बोलायचं झालं तर यात 2 AC 3-tier, 10 Sleeper, 4 General, 2 Second Seating with Brake Van अशी या गाडीची रचना असेल. (Central Railway)
नागपूर मिरज रेल्वेगाडी –
आणखी एक विशेष रेल्वेगाडी म्हणजे नागपूर मिरज रेल्वेगाडी… मिरज – नागपूर गाडी क्रमांक 01213 ही एकेरी विशेष गाडी आठ जुलै रोजी दुपारी बारा वाजून 55 मिनिटांनी मिरज रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि 9 जुलै रोजी 12 : 25 वाजता नागपूरला पोहोचणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हि विशेष ट्रेन अरग, पंढरपूर, कुर्डूवाडी, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, अशा महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.




