NRI होण्यासाठी आता २४० दिवस देशाबाहेर राहावे लागेल; सरकारने केला नियमांत बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी अर्थसंकल्प सादर करताना मध्यमवर्गासह जवळपास प्रत्येक वर्गाला दिलासा देण्याविषयी घोषणा केल्या. यावेळी, प्राप्तिकराच्या दरात मोठे बदल केले गेले. दरम्यान, अनिवासी भारतीय (NRI) होण्याच्या नियमात सरकारने बदल केला आहे. अर्थसंकल्पनांतर महसूल सचिव अजय भूषण पांडे यांनी याबाबत माहिती दिली.

पांडे म्हणाले की, “जर एखादा नागरिक १८२ दिवसांपेक्षा जास्त काळ देशाबाहेर राहिल्यास त्याला अनिवासी भारतीय मानले जात होते. परंतु आता ही मुदत २४० दिवसांपर्यंत वाढविण्यात आली आहे. आयकर कायद्यात हा बदल करण्यात आला आहे.”

पांडे पुढे म्हणाले की,”काही लोक कोणत्याही देशाचे रहिवाशी नसतात. त्यामुळं ते वेगवेगळ्या देशात राहतात. जर असा कोणताही भारतीय जगातील कोणत्याही देशाचा रहिवासी नसेल तर तो यापुढे भारताचा रहिवासी समजला जाईल आणि त्याच्या जगातील उत्पन्नावर कर लावला जाईल.”

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

मोदी सरकारने अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याची आशा सोडली- पी. चिदंबरम

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ; जाणून घ्या सोन्याचे नवीन दर

वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलं आतापर्यंतच सर्वात लांब भाषण; भाषण अर्धवट सोडून थांबल्या

 

Leave a Comment