फिरा मनसोक्त! खर्च मोदी सरकार देईल; जाणून घ्या काय आहे हा उपक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅल्लो महाराष्ट्र । तुम्हाला जर पर्यटनाची आवड असेल तर, मोदी सरकार तुमच्यासाठी एक खास उपक्रम घेऊन आलं आहे. पर्यटन मंत्रालयाने ‘देखो अपना देश’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत २०२२ पर्यंत जर तुम्ही देशातील १५ ठिकाणी पर्यटन केलं तर त्याचा खर्च सरकारकडून दिला जाणार आहे.

यामध्ये १५ पर्यटन ठिकाणी प्रवास करणार्‍यांच्या खर्चासाठी सरकार अनुदान देईल असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, सरकारकडून दिला जाणारा हा खर्च आर्थिक लाभ म्हणून नव्हे तर प्रोत्साहन म्हणून आहे असं सांगण्यात आलं आहे.

या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पर्यटन मंत्रालयाने उपलब्ध करून दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुमचे पर्यटनाचे फोटो अपलोड करुन माहिती देणे गरजेचे आहे. असं केंद्रीय पर्यटनमंत्री प्रह्लादसिंग पटेल यांनी सांगितलं. २४ जानेवारीला झालेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय पर्यटन कॉन्फरन्सच्या समारोपात ते बोलत होते. ओडिशाच्या कोणार्क येथे ही परिषद आयोजित करण्यात आली होती.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

TATAने केली देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV कार लाँच; इतकी असणार किंमत

देशद्रोहाचे कलम १२४ A काय आहे? काय आहे देशद्रोह कलमामागील इतिहास, वाचा सविस्तर

25 धावा करताच विराट कोहली मोडणार टी -20 मधील धोनीचे रेकॉर्ड