व्हिडिओ कॉलद्वारे 900 कर्मचाऱ्यांना काढून टाकणारे विशाल गर्ग यांना तत्काळ रजेवर पाठवण्यात आले, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । Better.com चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विशाल गर्ग यांना तात्काळ रजेवर पाठवण्यात आले आहे. व्हाईस यांनी शुक्रवारी एका ईमेलचा संदर्भ देत रिपोर्ट दिला. या रिपोर्टनुसार, चीफ फायनान्शिअल ऑफिसर (CFO) केविन रायन आता कंपनीचे दररोजचे निर्णय घेतील आणि बोर्डाला रिपोर्ट देतील. कंपनीच्या बोर्डाने लीडरशिप आणि कल्चरल असेसमेंटसाठी एका थर्ड पार्टी इंडिपेंडेट फर्मची नियुक्ती केली आहे. जेव्हा Reuters ने Better.com ला प्रतिक्रियेसाठी विचारले तेव्हा त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

यापूर्वी, विशाल गर्गने Zoom कॉलद्वारे 900 लोकांना नोकरीतून कमी केल्याबद्दल माफी मागितली होती. त्यांनी पत्र लिहून त्यांच्या या पद्धतीबद्दल कर्मचाऱ्यांची माफी मागितली. या पत्रात विशाल गर्गने आपली चूक मान्य करत आपली पद्धत चुकीची असून आपल्याकडून मोठी चूक झाल्याचे म्हटले आहे.

Zoom Meeting द्वारे 900 जणांना नोकरीतून काढून टाकण्यात आले
नुकतेच अमेरिकन कंपनीचे भारतीय वंशाचे सीईओ विशाल गर्ग यांनी त्यांच्या कंपनी Better.com मधील 900 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. त्यांनी Zoom Meeting बोलावली आणि कंपनीच्या 900 कर्मचाऱ्यांना पिंक स्लिप दिल्या. कामावरून काढून टाकण्याचे कारण प्रोडक्टिविटीमध्ये घट असल्याचे सांगण्यात आले. Zoom Meeting द्वारे 900 कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याचा व्हिडिओ ज्यांनी कोणी पाहिला आहे, ते विशाल गर्ग यांना खडूस बॉस म्हणू लागले.

900 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून का काढण्यात आले?
गर्ग यांनी कर्मचार्‍यांच्या छाटणीमागील कारणे म्हणून बाजारातील कार्यक्षमता, कामगिरी आणि प्रोडक्टिविटी असल्याचे सांगितले. Zoom वर वेबिनार घेत असताना ते म्हणाले की, ‘जर तुम्ही या वेबिनारमध्ये असाल, तर तुम्ही त्या दुर्दैवी गटाचा भाग आहात ज्यांना तत्काळ कामावरून काढून टाकले जात आहे. HR विभागाकडून त्यांना एक ई-मेल येईल, ज्यामध्ये फायदे आणि नोकरीतून काढून टाकण्याबद्दलची माहिती असेल.’

विशाल गर्ग कोण आहे ?
विशाल गर्ग हे Better.com चे फाउंडर आणि CEO आहेत, जे होमलोनसह घरमालकांना विविध सेवा पुरवतात. लिंक्डइनवर उपलब्ध माहितीनुसार, ते One Zero Capital या इन्वेस्टमेंट होल्डिंग कंपनीचे फाउंडर पार्टनर देखील आहे. 43 वर्षीय विशाल गर्गने ऑक्सफर्ड विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली आहे. ते त्यांची पत्नी आणि तीन मुलांसह न्यूयॉर्कमधील ट्रेबेका येथे राहतात. ट्रेबेका हे न्यूयॉर्क शहरातील सर्वात महागडे ठिकाण आहे, जिथे श्रीमंत लोकं राहतात.

Leave a Comment