हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दहावीचा निकाल काळ जाहीर झाला असून निकालानंतर मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरीही अकारावी प्रवेशाची सर्वाधिक उत्सुकता आहे. यंदा अकरावी प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यासाठी येत्या 19 जुलैपासून ऑनलाईन नोंदणीस सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.
अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा २१ ऑगस्ट पर्यंत घेण्यात येणार असून ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. 19 जुलैपासून सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. दरम्यान, राज्याचा दहावीचा निकाल 99.95 टक्के लागला असून दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली असून राज्यात मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे तर मुलांचा निकाल 99.94 आहे.
राज्यात दहावी उत्तीर्णांची संख्या १६ लाख असली तरी अकरावी प्रवेशाची क्षमता ही निश्चितच जास्त आहे. मागील वर्षी अकरावीच्या उपलब्ध जागांपैकी सुमारे ३२ टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे यंदाही अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही, अशी अपेक्षा शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आली.