छ. शिवाजी महाराजांचा केरळचा मावळा 370 गडकिल्ल्यांच्या मोहिमेवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
केरळचा एक युवक सायकलवरून शिवतीर्थ परिक्रमा (गड- किल्ले) करण्याचा निर्धार करत  प्रवासास निघाला आहे. या परिक्रमेत 370 किल्ल्यांना भेट देवून 6 हजार 500 किलोमीटरचा प्रवास करण्याचा निर्धार या युवकाने केला आहे. या प्रवासा दरम्यान आज स्वराज्याची राजधानी सातारा येथे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची हमरास एम. के. या युवकाने भेट घेतली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाने प्रेरित होऊन शिवरायांचा इतिहास आणि त्यांचे अजोड कार्य जाणून घेण्याच्या उद्देशाने युवकाने हा आगळावेगळा आणि अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि पराक्रमाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील 370 गड- किल्ल्यांना भेट देऊन, तेथील इतिहास जाणून घेऊन हि परिक्रमा पूर्ण करण्याचा त्याचा संकल्प आहे. आज हमरास एम.के. हा शिवप्रेमी युवक साताऱ्यात अजिंक्यतारा सर करण्यासाठी आला.

यावेळी त्याने आ. शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेतली. त्याच्या या महान कर्तुत्वाला सलाम करून आ. भोसले यांनी त्याच्या शिवतीर्थ परिक्रमा उपक्रमास शुभेच्छा दिल्या. हमरास आता सातारा जिल्ह्यातील गडकिल्ल्यांना भेट देत आहे.