राज्यपाल नियुक्त सदस्य निवड: ‘राज्यापालांकडे संविधानिक अधिकार, त्याचं ऐकावंच लागेल’- चंद्रकांत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । राज्यपाल नियुक्त सदस्यत्वासाठी १२ जणांच्या नावाची यादी लवकरच मुख्यमंत्री राज्यपालांकडे पाठवणार आहेत. याविषयी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज्यापालांकडे संविधानिक अधिकार आहेत त्याचं ऐकावंच लागेल’, असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते.

राज्यपाल भाजपला झुकतं माप देतात अशी चर्चा होतेय असा प्रश्न पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना पाटील यांनी, ‘राज्यपाल पदाची एक गरिमा असते ती राखली पाहिजे. अशी चर्चा करणारे ती राखत नाही. मी राज्यपालांच्या पदाचा मान ठेवतो त्यामुळं यावर मी काही बोलणार नाही,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रश्नांवर उत्तर देणंही त्यांनी टाळलं आहे.

देवेंद्रजी आणि राज्यपालांचे आधीचं ठरलंय
विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त जागांसाठी सरकारकडून येणारी नावं बाजूला ठेवली जाणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. “माझं आणि देवेंद्रजींचं बोलणं झालेलं आहे. राज्यपालांशी त्यांची चर्चा झालेली आहे. ही आलेली यादी बाजूला काढून ठेवण्याचं ठरलेलं असल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं”, असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

विनय कोरे यांच्या मातोश्रीच्या निधनानंतर सांत्वनासाठी गेलेल्या चंद्रकांतदादांनी हे वक्तव्य केलंय. सांत्वनानंतर राज्यपाल नियुक्त आमदार निवडीवर चर्चा सुरू झाली तेव्हा दादा म्हणाले, माझं आणि देवेंद्र फडणवीस यांचं बोलणं झालं आहे. त्यांचं आणि राज्यपालांचे बोलणं झालंय. सरकारकडून येणारी नावं बाजूला ठेवली जाणार आहेत. राज्यपालांना त्यांचे अधिकार आहेत, असं वक्तव्य करून दादांनी राज्यपाल आणि फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं आहे. तांत्रिक अडथळे आणून निवडीबद्दल चर्चा झाल्यास न्यायालयात जाण्याबाबत निर्णय घेऊ, असंही मुश्रीफांनी स्पष्ट केले आहे. हे सगळं असंवैधानिक आहे. राज्यपालांवर आतापर्यंत अनेक आरोप झाले आहे, असंही ग्रामविकास मंत्री मुश्रीफांनी अधोरेखित केले आहे.

कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment