कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी
चाफळची केंद्रशाळा ही जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची शाळा म्हणून कशी नावारुपास येईल, यासाठी प्रयत्न करणार आहे. कोरोनाच्या महामारीने अनेक कुटुंबे अक्षरशः उध्वस्त झाली आहेत, यासाठी शासन नियमांचे पालन करीत कोरोनाला वेशीबाहेर ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती राजेश पवार यांनी केले.
पाटण तालुक्यातील चाफळ येथील श्री समर्थ विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमातर्गत आयोजित विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्या रुपाली पवार, प्राचार्य ए. जे. कुंभार, सरपंच तुषार पवार, केंद्रप्रमुख अर्जुन पाटील,उमेश सुतार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय चव्हाण उपस्थित होते.
प्रास्ताविक अर्जुन पाटील यांनी केले. यावेळी सानिका बाबर, दर्शना जाधव या विद्यार्थ्यांनींनी तर प्राचार्य ए. जे. कुंभार, दादासाहेब गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य ए. जे. कुंभार यांची स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विद्यासमिती सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.