साध्वी प्रज्ञाविरुद्ध छगन भुजबळ करणार प्रचार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ भाजपच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञाविरोधात प्रचार करणार आहेत. छगन भुजबळ दौन दिवसाच्या भोपाळच्या दौ-यावर असणार असून काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या प्रचारासाठी ते भोपाळमध्ये प्रचार सभा घेणार आहेत.

भुजबळ यांच्यासोबत राष्ट्रवादीचे इतर नेत्यांसह कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी हे देखील असणार असल्याचे वृत्त आहे. भोपाळमध्ये 12 मे रोजी मतदान होणार आहे. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाआघाडी आहे.

भोपाळमध्ये काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध भाजपने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी राहिलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी दिली आहे. पुढील दोन दिवस छगन भुजबळ भोपाळच्या दौ-यावर असणार असून ते साध्वी प्रज्ञा यांच्याविरुद्ध प्रचार करणार आहेत.

Leave a Comment