चाैघांना वनकोठडी : संरक्षक कुटीची व होडीची जाळपोळ करणाऱ्यांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सह्याद्री व्याघ्र प्रकल्प बामणोली कार्यालय हद्दीतील म्हाळुंगे बिट अंतर्गत येणाऱ्या आडोशी येथे संरक्षक कुटीचे नुकसान व होडीची जाळपोळ करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी अविनाश गोविंद जाधव यांच्यासह अन्य तिघांना अटक केली आहे. संशयितांना मेढा न्यायालयात हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे.

तुषार यशवंत सावंत (वय- 22), शैलेश महादेव साळुंखे (वय -21), किरण रामचंद्र साळुंखे (वय -21) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. दि. 29 रोजी आडोशी येथे अविनाश जाधव या माजी वनमजूराने संरक्षक कुटीचे नुकसान करत होडीची तोडफोड केली होती. तसेच सुमारे 43 हजार रूपयांचे साहित्य चोरून नेले होते. या प्रकरणात आणखी तिघांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अविनाश याचे साथीदार तुषार सावंत, शैलेश साळूंखे व किरण साळूंखे यांना अटक केली होती.

या तोडफोडीमध्ये अविनाशला या तिघांनी मदत केली होती. याप्रकरणी वन विभागाच्या कोअर क्षेत्रात अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी दरम्यान, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प वन्यजीव विभाग यांचा स्वतंत्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे या चाैघांचा ताबा बामणोली कार्यालय वनक्षेत्रपाल बी.डी. हसबनिस यांचेकडे देण्यात आला आहे. ही कारवाई व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत, सहाय्यक वनरक्षक सुरेश साळूंखे, यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल बी. डी. हसबनीस, हवालदार आर. एन. गायकवाड, दिगंबर माने यांनी केली.

Leave a Comment