हार्डकोअर चेनस्नॅचर्सला पोलिसांनी झडप घालून पकडलं; हेल्मेट, चाकूही गवसला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती : वर्षभरापासून अमरावती शहरात धुडगूस घालणाऱ्या मंगळसूत्र चोरांच्या टोळीला पकडण्यात गाडगेनगर पोलिसांना मंगळवारी सायंकाळी यश आले. यंदाच्या चेनस्नॅचिंगच्या तब्बल ११ घटनांची कबुली त्या चोरजोडीने दिली.

त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, हेल्मेट व चाकू जप्त करण्यात आला. सोन्याच्या रिकव्हरीसाठी एक पथक स्थानिक सराफा बाजारात तळ ठोकून आहे. यात अन्य तिघांनादेखील ताब्यात घेण्यात आले आहे.

गाडगेनगर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश इंगोले व डीबीचे पथक सायंकाळी ६ च्या सुमारास पॅराडाईज कॉलनीत गस्त घालत होते. त्यावेळी मो. समीर या पोलिसाचे दुचाकीवरील दोघांकडे लक्ष गेले. त्यातील एकाने हेल्मेट घातले होते, तर दुसऱ्याच्या गळ्यात केशरी पिवळा दुपट्टा होता.

ते चेनस्नॅचर असल्याची खात्री पटताच मो . समीर यांनी त्यातील एकावर झडप घातली. हाती आलेल्याची ओळख जगजितसिंह टांक अशी पटविण्यात आली. विकेश रावसाहेब खंडारे सरस्वतीनगर , नांदगाव पेठ ) हा पसार झाला.

जगजितसिंगला ताब्यात घेऊन गाडगेनगरला आणण्यात आले. तेथे डीसीपी मकानदार, एसीपी पूनम पाटील व पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर यांच्यापुढे उपस्थित केले. त्यानंतर जगजितसिंगने शहरातील ११ गुन्ह्यांची कबुली दिली. उशिरा रात्री विकेशला नांदगाव पेठ येथून अटक करण्यात आली. अमरावती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

Leave a Comment