Champions Trophy 2025 : पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीबाबत टीम इंडियाचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मिनी विश्वचषक स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी चॅम्पियन ट्रॉफी (Champions Trophy 2025) पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेची तयारीही सुरु केली असून स्पर्धेचं संभाव्य वेळापत्रकही समोर आलं आहे. मात्र टीम इंडिया पाकिस्तानला जाणार कि नाही हा खरा प्रश्न आहे. कारण मागील अनेक वर्षांपासून भारतीय संघ पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळलेला नाही. आताही टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही तर श्रीलंका किंवा दुबईत भारतीय संघाचे सामने आयोजित करण्याची मागणी BCCI करू शकते.

मागील अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंध बिघडले आहेत. दोन्ही देशांमध्ये एकही द्विपक्षीय सीरीज झालेली नाही. आयसीसी टुर्नामेंट आणि आशिया कपच्या निमित्तानेच भारत आणि पाकिस्तानचा संघ आमनेसामने येत असतात. गेल्या वर्षी आशिया चषकमध्ये हायब्रीड मॉडेल अंतर्गत पाकिस्तानातील भारताचे सर्व सामने श्रीलंकेत आयोजित करण्यात आले होते. यंदाही हीच पद्धत राबवण्यात यावी आणि टीम इंडियाचे सामने दुबई किंवा श्रीलंकेत घ्यावेत अशी मागणी बीसीसीआय ICC कडे करण्याची शक्यता आहे.

हायब्रीड मॉडेलच्या आधारे खेळली जाईल Champions Trophy 2025

याबाबत बीसीसीआयच्या सूत्राने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (Champions Trophy 2025) पाकिस्तानला जाण्याची शक्यता नाही, परंतु याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकार घेईल. अशा स्थितीत हायब्रीड मॉडेलवर काम केले जाणार आहे. आशिया चषकाप्रमाणे, भारत आपला सामना संयुक्त अरब अमिराती (UAE) किंवा श्रीलंकेत खेळू शकतो. परंतु यासंदर्भात निर्णय आयसीसी घेईल, परंतु सध्या आम्ही फक्त यावरच विचार करत आहोत. भविष्यात काय होईल ते माहित नाही परंतु सध्या तरी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा हायब्रीड मॉडेलच्या आधारे खेळली जाईल असे दिसते.

2008 पासून भारतीय संघाने कधीही पाकिस्तानला भेट दिली नाही. गेल्या वर्षी तत्कालीन केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले होते की, जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलीकडील दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत भारत पाकिस्तानसोबत द्विपक्षीय क्रिकेट मालिका सुरू करणार नाही. दरम्यान, ड्राफ्ट शेड्यूलनुसार टीम इंडियाला आपले सर्व सामने लाहोरमध्ये खेळायचे आहेत. भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांग्लादेश विरुद्ध होईल. दुसरा सामना 23 फेब्रुवारीला न्यूझीलंड विरुद्ध होईल. ग्रुप स्टेजचा तिसरा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध 1 मार्चला होऊ शकतो.