चना खरेदी प्रक्रिया तातडीने राबवा – कॉंग्रेस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मागणी तात्काळ मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चना खरेदी प्रक्रिया तातडीने राबविण्यासाठीचा निर्णय घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी निवेदन देण्यात आले. शासनाकडून चना खरेदी प्रक्रिया स्थगित केल्यामुळे शेतकऱ्यांना ११०० ते १२०० रुपये कमी बाजारभावाने आपला माल व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. या स्थगित धोरणामुळे शेतकऱ्यांत तीव्र नाराजी पसरली असून शेतकरी बांधवांचं जगण मुश्किल झाल आहे.

पाण्याचा सुद्धा प्रश्न गंभीर झाला आहे.तसेच यावर्षी झालेल्या कमी पावसामुळे शेतकऱ्यांचे आधीच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असताना शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी आणखी हवालदिल झाला आहे. आघाडी सरकारच्या तुलनेत आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण युती सरकारमध्ये दुप्पट झालं आहे.

याचं भान ठेवून शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि चना खरेदी सुरू करावी असं मत बबलू देशमुख, विरेंद्र जगताप व यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान या सगळया मागण्या जर मान्य केल्या नाहीत तर आंदोलन छेडण्याचा ईशारा अमरावती जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने देण्यात आला.

Leave a Comment