हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आचार्य चाणक्यांच्या नीतीचे (Chanakya Niti) पालन करून अनेकांनी जगावर राज्य केले आहे. आचार्य चाणक्य यांनी माणसाला कार्यक्षम जीवन जगण्यासाठी अनेक तत्वे दिली आहेत. चाणक्य नीती मध्ये त्यांनी जीवन व्यवस्थितपणे जगण्यासाठी आणि सोपे करण्यासाठी काही सांगितली आहेत. त्यांनी आपल्या नीतीत कठोरपणे माणसाचे काही अवगुण सुद्धा सांगितले आहे. आज आम्ही तुम्हाला आचार्य चाणक्यांनी माणसाच्या स्वभावातीत सांगितल्या त्या ३ दोपांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे मनुष्य त्याच्या जीवनात कधीच पुढे जाऊ शकत नाही.
1) लोभी–
आचार्य चाणक्याच्या मते, लोभ हा असा दोष आहे ज्याला कोणताही आधार नाही. लोभी माणूस कधीही पुढे जाऊ शकत नाही. आयुष्यातील सुख-सुविधांसाठी आपण सगळेच पैसे कमावतो, पण चुकीच्या पद्धतीने कमावलेला पैसा फक्त वाया घालवतो.
2) अहंकार असलेला-
चाणक्य नीती नुसार, ज्या माणसाला अहंकार आहे किंवा जो गर्वाने जगतो तो खर तर स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतो. गर्व आणि अहंकारात बुडालेली माणसे इतरांप्रमाणे स्वतःला श्रेष्ठ समजतात. पद आणि पैशाचा ज्याला आहे तो या नशेतून बाहेर आला नाही तर तो पूर्णपणे उद्ध्वस्त होतो.
3) खोटे बोलणारा-
जो माणूस खोट बोलतो त्याला त्याची शिक्षा कधी ना कधी मिळतेच. स्वतःच्या स्वार्थसाठी खोट बोलताना सुरुवातीला छान वाटते पण नंतर जेव्हा खोटं उघड होते तेव्हा आपण अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे खोटं बोलणारा माणूस कधीही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही.