हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आचार्य चाणक्य यांच्या (Chanakya Niti) धोरणांचे पालन करून अनेकांनी जगावर राज्य केलं. आचार्य चाणक्य यांनी माणसाला कार्यक्षम जीवन जगण्यासाठी अनेक तत्वे दिली आहेत. चाणक्यनीतीत वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी मिळण्यासाठी सुद्धा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या निती शास्त्रामध्ये जीवनसाथी निवडण्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आपला जीवनसाथी कसा असावा याबाबत सांगताना चाणक्यांनी मुलींच्यामधील असे काही गन सांगितले आहेत तशी मुलगी आपल्याला भेटल्यास आपलं घर सुद्धा अगदी स्वर्गासारखं होईल. चला याबाबत जाणून घेऊया ….
आचार्य चाणक्य यांनी दिलेल्या तत्वानुसार, विवाहापूर्वी जोडीदार निवडताना व्यक्तीने शरीराऐवजी गुणांकडे पाहिले पाहिजे.
चाणक्यनीती नुसार, कोणत्याही स्त्री मध्ये बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य जास्त असावे. चांगलं दिसण्यापेक्षा मनाने चांगलं असं महत्वाचे असत.
कौटुंबिक जडणघडणीत आणि वाटचालीत पत्नींचे योगदान खूप महत्वपूर्ण असते. कारण सुशिक्षित आणि सुसंस्कृत स्त्री सून म्हणून घरात आली तर ती कुटुंबात एकोपा वाढवते आणि घराची भरभराट करते.
राग हा सर्वात वाईट असतो. रागामुळे अनेकदा होत्याच नव्हतं झाल्याची उदाहरणे आपण बघितली आहेत. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणं प्रत्येकाचे काम आहे. चाणक्यनीती नुसार, ज्या स्त्रीला खूप राग येतो ती कुटुंबाला कधीही सुखी ठेवू शकत नाही.
आचार्यांच्या धोरणानुसार, जी स्त्री तिच्या मर्जीने किंवा स्वखुशीने लग्न करत नाहीत अशा स्त्रीशी कधीही लग्न करू नये. कारण अशी स्त्री तुम्हाला आनंदी ठेवू शकत नाही आणि तुमचा आदरही करू शकत नाही.