हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आचार्य चाणक्यांच्या नीतीचे (Chanakya Niti) पालन करून अनेकांनी जगावर राज्य केले आहे. त्यांनी मानवाला कार्यक्षम जीवन जगण्यासाठी अनेक तत्त्वे दिली आहेत. चाणक्यनीती मध्ये अनेक धोरणांचा उल्लेख केला आहे ज्या तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक वळणावर योग्य निर्णय घेण्यास मदत करतील. आचार्य चाणक्यांनी चाणक्यनीतीत अनेक प्राण्यांचे गुण सांगितले आहेत. चाणक्य नीतीनुसार, माणसाने प्रत्येक प्राण्यापासून काही ना काही गोष्टी घेतल्या पाहिजेत. महिलांनी कावळ्याप्रमाणे आणि पुरुषांनी कुत्र्याप्रमाणे सावध असले पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीने कुत्र्याचे 4 गुण अंगीकारले तर त्याची पत्नी नेहमी आनंदी राहते. चला या गुणांबद्दल जाणून घेऊया.
मेहनत –
माणसाने नेहमी पूर्ण मेहनत करावी आणि (Chanakya Niti) जे मिळेल त्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. घराचा खर्च स्वतःच्या उदरनिर्वाहातून करावा. असे करणारे पुरुष नेहमीच यशस्वी होतात. कुत्र्यांमध्ये आपल्याला हा गुण नेहमीच दिसून येतो. तुम्ही त्यांना जे काही द्याल ते खाण्यातच ते आनंद मानतात.
शूर असावे –
कुत्र्यांना नेहमीच शूर प्राणी म्हटले जाते. तो त्याच्या मालकासाठी कोणासोबतही लढण्यास मागेपुढे पाहत नाही . आपल्या मालकाचे रक्षण करण्यासाठी कुत्रा स्वतःच्या जिवाचीही पर्वा करत नाही. त्याचप्रमाणे माणसानेही नेहमी शूर असले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमच्या पत्नीला एकटे सोडता काम नये. शूर नवऱ्यावर नेहमीच बायका प्रेम करतात.
नेहमी सावध राहावे-
प्रत्येक माणसाने नेहमी सावध राहिले पाहिजे. (Chanakya Niti) जेणेकरून ते त्यांच्या घराची आणि पत्नीची योग्य काळजी घेऊ शकतील. तुम्ही सदैव सावध राहिल्यास तुमचा शत्रू हल्ला करण्यासही घाबरेल. हा गुण कुत्र्यांमध्ये नेहमीच दिसून आला आहे. एखादा कुत्रा झोपेत असले परंतु त्याला थोडासा जरी आवाज आला तरी ते सावध होते. त्यामुळे हा गुण असलेल्या पुरुषाच्या बायका नेहमी आनंदी असतात.
निष्ठा असावी – (Chanakya Niti)
जेव्हा जेव्हा निष्ठेचा विषय येतो तेव्हा तेव्हा आपल्यापुढे कुत्र्याचे उदाहरण समोर येतं. कुत्र्यासारखा निष्ठावान प्राणी जगात दुसरा कोणी नाही. कुत्र्याप्रमाणेच पुरुषांनीही नेहमी निष्ठावान राहावे. आपल्या पत्नीशी नेहमी विश्वासू राहावं. आपली पत्नी सोडून पुरुषांनी इतर कोणत्याही स्त्रीबद्दल कधीही विचार करू नये. जे पुरुष असे करतात ते त्यांच्या पत्नीला कधीही नाराज करू शकत नाहीत.