Saturday, January 28, 2023

गाडीच्या बोनेटवर बसून तलवारीने केक कापणे गुंडाच्या अंगलट, 12 जणांवर गुन्हा दाखल

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

साताऱ्यातील चंदननगर येथील गुंड वैभव जाधव याने तलवारीने केक कापून वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. 15 ते 20 जणांनी जोरजोरात गाणी लावून रस्त्यावर केला नाचगाणे केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संशयित वैभव चंद्रकांत जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

सातारा शहरात रस्त्यावर फटाक्यांची आतिषबाजी करत गाडीच्या बोनेटवर बसून कापला तलवारीने केक कापला आहे. मध्यरात्री धारधार तलवारी नाचल्याने स्थानिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संशयित गुंड वैभव जाधवचा पोलिस शोध घेत आहेत. सातारा शहरातून गुंड वैभव जाधव काही महिने हद्दपार होता. तलवारीने केक कापल्याबद्दल वैभव जाधव यांच्यासह 10 ते 12 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा शहरात जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे व कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वैभव जाधव यांच्यासह 12 जणांच्यावर गुन्हा नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच यापुढे असे तलवारीने केक कापल्यास कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.