औरंगाबाद – चंद्रकांत खैरेंचं काम औरंगजेबासारखं असून त्यांच्या काळात औरंगाबादचा काहीच विकास झाला नाही. खैरेंची ३० वर्षांची सत्ता औरंगाबादेत होती पण याकाळात शहर खिळखिळे झाले आहे. तसेच त्यांनी जिल्ह्याच्या विकासात अडचणी आणू नये. खैरे हे भागवत कराडांची कधीच बरोबरी करू शकत नाहीत, असा घणाघात भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत खैरेंनी ईसकाळला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की कराडांनी त्यांनी नगरसेवक आणि महापौर केले. तसेच रावसाहेब दानवेंनी जावयाला पुढे करून लोकसभा निवडणुकीत पाडल्याचाही आरोप खैंरेंनी केला होता. त्याला प्रत्यूत्तर देताना आमदार बंब यांनी खैरेंची तुलना औरंगजेबाशी केली आहे. प्रशांत बंब यांनी खैरेंवर केलेल्या या घणाघाती आरोपांमुळे जिल्ह्यातील राजकारण तापले आहे.
पुढे बोलताना आमदार बंब म्हणाले की, ‘खैरेंपेक्षा विद्यमान खासदार इम्तियाज जलील चांगलं काम करत आहेत. जलील जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी झटत आहेत. जरी खासदार जलील एमआयएमचे असले तरी त्यांचे काम खैरेंपेक्षा चांगली आहेत. खैरेंनी मागील २० वर्षांपासून जिल्ह्यासाठी काहीच केलं नाही. रावसाहेब दानवे यांनी मला पाडलं असा आरोपही खैरेंनी केला आहे. त्यावर बोलताना बंब म्हणाले, खैरेंना खरंतर २० वर्षांपूर्वीच पाडलं पाहिजे होतं. त्यांच्याकाळात जिल्ह्यात काहीच विकासकामे झाली नाहीत.
चंद्रकांत खैरेंना केद्रीय राज्यमंत्री भागवत कराड कराडांनीही ट्विट करत उत्तर दिले आहे. खैरेंच्या या दाव्याचा समाचार कराड यांनी घेतला असून ‘तुम चाहे कितना भी किचड उछालो, मै कमल की तरह खिलता रहूंगा,’असे ट्विट त्यांनी केले आहे. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आपला झालेल्या पराभव रावसाहेब दानवे यांच्या दगाबाजीमुळे झाल्याचा आरोप त्यांनी केला. ‘युती असतानाही दानवेंनी अनेक नगरसेवक फोडले तसेच पैशांचा वापर करून दानवेंनी माझ्या विरोधात छुपा प्रचार केला होता,’ असा थेट आरोप केला होता.