राजाबरोबर आता प्रजाही वर्क फ्रॉम होम; चंद्रकांतदादांचा मुख्यमंत्र्यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारच्या वतीने सरकारी तसेच खासगी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी, पदाधिकाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आणि पन्नास टक्के क्षमतेने काम करण्याचे आदेश दिले आहेत. या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही आजारपणामुळे घरातूनच काम करीत असल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी वर्क फ्रॉम होमवरून मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत. आता राजाही वर्क फॉम होम आणि प्रजाही वर्क फॉम होम. महाविकास आघाडी सरकारामधील नेत्यांचा आपाआपसात पायपोस नाही, असे पाटील यांनी म्हंटले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांदादा पाटील यांनी ट्विट करीत निर्बंधांवरून निशाना साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, मोदीजी म्हणाले होते की, प्रत्येक जीव वाचवायला हवा. पण कोरोना रोखण्यात मविआ सरकार अपयशी ठरल्याने कठोर निर्बंधांच्या जात्यात भरडलेले जीव आत्महत्या करताहेत. टोपेजी, राजकारण आणि कुरघोडीचा प्रयत्न सोडा. परिस्थिती समजून जनतेला त्रास होणार नाही, हे बघा.

लॉकडाउन, निर्बंध, कठोर निर्बंधांना मी सातत्यानं विरोध केलाय. आरोग्यमंत्री टोपेंनी त्यावरून मला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ‘जान हैं तो जहाँ है’ या वक्तव्याची आठवण दिलीये. टोपेजी, लक्षात घ्या, इतके निर्बंध लादू नका की जीवच नकोसा होईल, हेच मी सातत्यानं सांगतोय.

मी अनेकदा हे सांगितलं होतं की, निर्बंध शिथिल करा, लोकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करा आणि जनजीवन सुरूच ठेवा. मात्र सरकारने जनतेचा काहीही विचार केला नाही आणि अशा कित्येक तरुणांनी हे टोकाचं पाऊल उचललं. या सर्व आत्महत्यांसाठी राज्य सरकारच जबाबदार आहे.

मी अनेकदा हे सांगितलं होतं की, निर्बंध शिथिल करा, लोकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करा आणि जनजीवन सुरूच ठेवा. मात्र सरकारने जनतेचा काहीही विचार केला नाही आणि अशा कित्येक तरुणांनी हे टोकाचं पाऊल उचललं. या सर्व आत्महत्यांसाठी राज्य सरकारच जबाबदार आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.