शिवसेनेच्या पत्रकार परिषदेपूर्वीच भाजप नेते दिल्लीला रवाना; चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील एकूण राजकीय वातावरण आणि केंद्रीय तपास यंत्रणा यावरून शिवसेना आज मुंबईतील शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेणार आहे. संजय राऊत या पत्रकार परिषद मध्ये नेमका काय खुलासा करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लाइ असतानाच या पत्रकार परिषदेपूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि किरीट सोमय्या हे दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे चर्चाना उधाण आले आहे.

मला अटक करून दाखवा, मी कोणाला घाबरत नाही.. मी बसलेलोच आहे. माझी बॅग भरलेलीच आहे, असं पत्रकार परिषदेत जाहीरपणे सांगणारे किरीट सोमय्याही सायंकाळी 5 वाजता दिल्लीला रवाना होणार आहेत. त्यामुळे नेमक दिल्लीत जाऊन कोणाची भेट घेणार याची उत्सुकता लागली आहे.

दरम्यान, दिल्लीला गेल्यानंतर चंद्रकांत पाटील आणि किरीट सोमय्या हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पाटील आणि सोमय्या यांच्या या दिल्लीवारीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे.