‘पवारांना हा पाटील कोण आहे अजून ओळखता आला नाही’ – चंद्रकांत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापुर प्रतिनिधी । ‘शरद पवारांना पाटील अजून ओळखताच आला नाही. त्यामुळे पवारांनी मला कोथरूडला अडकवून ठेवण्यात यश आल्याचं म्हणत बसू नये. चेहऱ्यावरून आणि देहबोलीवरून माझ्या डोक्यात काय सुरू हे तुम्हाला कळणार नाही. माझ्या फटक्याचे तुम्ही इतके अनुभव घेतले आहेत की त्यांच्यात आता उत्साह राहिला नाही,’ असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली.

कोल्हापुरात शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारावेळी चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका करत असताना शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. पाटील यांनी आपले राजकीय कौशल्य कसे पवारांपेक्षा निराळे आहे तसेच पवार अजून आपल्या राजकीय खेळी समजण्यात कसे कमी पडत आहेत. हेच आपल्या टीकेतून प्रचार सभेत सांगण्याचा प्रयन्त केला.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर अनेक मतदारसंघात बंडखोरांनी डोकं वर काढलं आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमधील कार्यकर्त्यांना दम भरत ‘युती धर्म तोडणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल,’ असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला. परंतु , पाटील यांनी पवार यांच्यावर केलेल्या हल्ल्याला राष्ट्रवादी कसे उत्तर देते हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.

इतर काही बातम्या-