Sunday, April 2, 2023

चंद्रकांत पाटलांच्या चॅलेंजला संजय राऊतांचा टोला; म्हणाले…

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महापालिका निवडणुकीवरून आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना चॅलेंज दिले. चंद्रकांत पाटलांच्या चॅलेंजवरून राऊतांनी आपल्या शैलीत टोला लगावला. “मुंबई महापालिकेवर विरोधक काही ताकद अजमावत असतील तर त्यांनी आजमावी. मात्र, मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा हा व्यक्तिगत स्वरूपाचा नाही. तो तसाच फडकत राहणार आहे. काही फरक पडत नाही,”असे राऊत म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला भेटण्याचा अधिकार आहे. आमचा अजूनही लोकशाहीवर विश्वास आहे. आमच्याकडे काही पेगासस यंत्र नाही. आम्ही काय कोणावर पाळतीसाठी ठेवलेले नाही. कोणी कोणाला भेटण्यावर बंधन नाही. आम्हालाही अशा प्रकारे अनेकजण भेट असतात. त्याला आम्ही काही फारसे महत्व देत नाही.

- Advertisement -

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर अनेक राजकीय चर्चाना उधाण आले होते. अशात चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत त्यांना महापालिका निवडणुकीत उतरून दाखवण्याचे खुलले आव्हानही दिले. पाटलांच्या आव्हाणांनंतर संजय राऊत यांनीही आपल्या शैलीत टोला लगावला आहे.