जयंतरावांची अवस्था ‘नाचता येईना, अंगण वाकडे’ : चंद्रकांतदादा पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादीला स्वतःचे नेते, कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत. जे-जे कोण आमच्याकडे येईल, त्यांना आम्ही सामावून घेणार आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांना न सांभाळता येणाऱ्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची अवस्था नाचता येईना, अंगण वाकडे,’ असल्याची तोफ महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डागली. सांगली लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्या. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आमच्यावर टीकेत धन्यता मानण्यापेक्षा त्यांनी आपले कार्यकर्ते, नेत्यांना सांभाळावे. अन्यथा तुमच्या दोन्ही बाजुचे कार्यकर्ते कुठे आहेत. याचाही विचार करावा लागेल. सांगली जिल्ह्याचे नेते म्हणवून घेणाऱ्यांना लोकसभेसाठी आघाडीचा उमेदवारही मिळेना झाला आहे. आमदार जयंत पाटील यांची अवस्था नाचता येईना, अंगण वाकडे अशी झाली आहे. मतभेत आणि उमेदवार नसल्याने सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडायची वेळ आली. खासदार संजयकाका पाटील यांनी गेल्या पाच वर्षेत केंद्र, राज्य सरकारचा निधी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात आणून विकास साधला आहे.

सिंचन योजनांबाबत तर त्यांची कामगिरीने लोक खुश आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी जनता पुन्हा भाजपच्याच पाठीशी आहे. त्यामुळे विजयी आम्हीच होणार यामध्ये कोणतीही शंका नसल्याचे महसूलमंत्री पाटील यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

रणजितसिंहांचे भाषण ऐकण्यासाठी पवारांनी बैठक थांबविली…

पुरूषोत्तम जाधवांचा शिवसेनेत प्रवेश, उदयनराजे भोसलेंच्या विरोधात लढवणार लोकसभा

बैलाच्या मृत्यूने कुटुंबीय हेलावले ; लाडक्या राजाचा दशक्रिया विधी सर्वत्र चर्चेत

वसंतदादा घराण्याला संपविण्याचा प्रयत्न, विशाल पाटीलांचा जयंत पाटीलांवर हल्लाबोल

रणजीतसिंह मोहिते पाटिलांनंतर राष्ट्रवादीच्या या माजी खासदाराच्या मुलाचा भाजप प्रवेश

Leave a Comment