भाजपने ऑफर दिली होती, पण…; वसंत मोरेंचा मोठा गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोंग्यावरील भूमिकेवरून नाराज असलेलं पुण्याचे माजी मनसे नगराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसेच्या ठाणे येथील उत्तरसभेत बोलताना एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्याला भाजपची ऑफर दिली होती अशी माहिती वसंत मोरे यांनी दिली.

ठाणे येथील मनसेच्या उत्तरसभेत बोलताना वसंत म्हणाले की, मी आणि साईनाथ बाबर असे दोनच नगरसेवक पुण्यात आहोत. राज ठाकरेंच्या ब्लू प्रिंटनुसार आम्ही करतोय. आमचं काम बघायला तुम्ही पुण्यात या. पुण्यात इतर पक्षातील शेकडो नगरसेवक असले तरीही चर्चेतील चेहरा हा पुरस्कार मनसेच्या नगरसेवकाला मिळाला. आपण आपलं काम सामान्य जनतेपर्यंत पोचवायला हवं. महापालिकेत आम्ही काम केलंय. पुण्यात 16 वर्षांत 16 गार्डन करणारा मी एकमेव नगरसेवक आहे.

ज्यावेळी मला पुरस्कार देण्यात आला, त्यावेळी आमदार चंद्रकांत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. चंद्रकांतदादांनी मला पाहिलं. त्यावेळी ते मला म्हणाले की, तुम्ही भाजपमध्ये या तुम्ही नगरसेवक व्हाल. मी त्यांना सांगितलं की, 15 वर्षे भाजपच्या नगरसेवकांनाच पाडून मी नगरसेवक होतोय असे प्रत्युत्तर त्यांनी त्यावेळी दिले होते.

Leave a Comment