“उद्धव ठाकरेंना मलिकांचा राजीनामा घ्यायचा असेल पण त्यांच्यावर दाऊदचा दबाव”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयकर विभागाच्यावतीने आज सकाळी मुंबईत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या राहुल कनाल यांच्या घरी छापा टाकण्यात आला. तसेच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानेत्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मलिक यांचा राजीनामा घेण्याचा ठरलं होतं मात्र कुणाचा दबाव होता. कदाचित ठाकरेंवर दाऊदचाही दबाव असेल, असे पाटील यांनी म्हंटले.

चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावाच लागेल, त्यांचा राजीनामा घेण्याचा ठरलं होतं मात्र कुणाचा दबाव होता त्यामुळे राजीनामा झाला नाही, कदाचित दाऊदचाही दबाव असेल, हा माझा अंदाज आहे, मी जेवढं उद्धव ठाकरे यांना ओळखतो. त्यानुसार त्यांना नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायचा असेल, पण त्यांच्यावर दबाव आहे एवढं नक्की, असे पाटील यांनी म्हंटले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आयकर विभागाच्यावतीने राहुल कणाल यांच्या घरी टाकण्यात आलेल्या छाप्याबाबतही प्रतिक्रया दिली. ते म्हणाले की, आज जे सुपात आहेत. त्यांना उध्या जात्यात जावंच लागणार आहे. काहीही झाले तरी आम्ही नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायला लावणार आहोत. कोणत्या परिस्थितीत पोलिसांची परवानगी मिळाली नाही तरी आम्ही मोर्चाचे हा काढणारच आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Leave a Comment