शेती उपयोगी ‘शेतकरी’ मासिकाचे कृषीमंत्री पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | स्वप्नील हिंगे

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘शेतकरी’ मासिकाचे प्रकाशन महसूल मंत्री व कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.

ज्वारी, बाजरी, नाचणी सारख्या तृणधान्यांची लागवड ते काढणीपर्यंतची सविस्तर माहिती या मासिकाच्या विशेषांकात दिली आहे. याचा तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल अशी माहीती चंद्रकांत प‍ाटील यांनी दिली. मुंबई येथील प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.

तसेच ज्वारी, बाजरी, नाचणी या पिकांच्या प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन दिल्यास मूल्यवृद्धी होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते असे मत पाटील यांनी व्यक्त केले. दरम्यान केंद्र सरकारने चालू वर्ष ‘राष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे असेही पाटील यांनी जाहीर केले.

Leave a Comment